STORYMIRROR

Babu Disouza

Classics

4  

Babu Disouza

Classics

शिवराज्य

शिवराज्य

1 min
444

हिंदवी स्वराज्य स्थापले राजे शिवरायांनी

स्वातंत्र्याचे सुखस्वप्न ते दिले शिवरायांनी


महाराष्ट्राची अस्मिता जागविली स्वाभिमानी

जमविले सवंगडी निष्ठावंत नि इमानी


कडवे, कणखर मर्द मावळे एक छत्र झाले

गड किल्ले उभारून सुरक्षित शिवसत्र झाले


धूर्त गनिमी काव्याने दुश्मनास जेरीस आणले

साकारावे माँ जिजाऊंचे स्वातंत्र्य परिस जाणले


लोककल्याणकारी राजा रयतेचा शिवशाहीने

धर्म अबाधित राखला अब्रू शाबूत शिवाज्ञेने


या देशात पुन्हा जाहला नाही राजा असा समर्थ

रक्षावे प्राणपणाने ज्याने दिला जगण्यास अर्थ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics