गौळण
गौळण
घट घेऊनिया कटीवर गात जाते हरीनाम
मी गोकुळची गौळण विकते विकते मी हरीनामllधृll
प्रीतिच्या फुलांचे करते शिंपण
सुधा रस मी करते औ प्राषाण
भक्ती भावाने घालून अंजन पाही डोळा साजेधाम
मी गोकुळची गौळण विकते विकते मी हरीनामll१ll
सुख शांतीचे हेच नवगीत
लागे गोड प्रेमरस हेच संचित
जमेल त्यास देत जावे मिळेल त्यास संजीवन
मी गोकुळची गौळण विकते विकते मी हरीनामll२ll
श्रीधर वाजवी मुरलीशी
राधा धावे वृंदावनाशी
पाहता त्या सावळ्या कृष्णाशी जाई विसरुनी भान
मी गोकुळची गौळण विकते विकते मी हरीनामll३ll
