चिंता
चिंता
नको करू चिंता
होऊ नको दुःखी
कधी सोडू नको
जगी माणुसकी||१||
भावाचा भुकेला
देवाची ती लीला
स्थान ते अढळ
त्या ध्रुवबाळाला||२||
आंधळ्याच्या गाई
जगी देव राखी
द्वारकेचा राणा
गोकुळी गुराखी||३||
भक्तांसाठी देव
जन्म घेई लोकी
दयेचा सागर
नाव घेई मुखी||४||
वारकरी संगे
एकरूप झाला
सोडुनी वैकुंठ
वाळवंटी आला||५||
जीवनी नसावा
कधी हेवा दावा
कामी येईल अंती
सद्गुणांचा ठेवा||६||
चिंता नको मनी
शोध अंतर्यामी,
सर्वांनाच जाणे
शेवटी मुक्कामी||७||