अथांग
अथांग
1 min
481
वाटे एखाद्या सांजवेळी,
विसावे तुझ्या बेधूंद किनारी
असे रमावे तुझ्यात की,
विरुन जावी दुनिया सारी
हलकेच मी मांडत जाईन,
उगाच माझ्या मनाचे पसारे
नकोच तो संशयाचा कल्लोळ,
आता मिटु दे अंतरीची अंतरे
कश्याला हवय पाठबळ,
वरवरच्या मृगजळी स्वप्नांना
तुझ्याच लाटांकडून शिकलेय रे,
पडता पडता सावरायला
जपून ठेवेन मी आठवणींपरी,
सांडलेल्या त्या शिंपल्यांना
एकटक पाहत राहते मी,
आभाळ क्षितीजावर विरघळताना
