STORYMIRROR

Nandini Menjoge

Inspirational

3  

Nandini Menjoge

Inspirational

असे काही घडले होते !!

असे काही घडले होते !!

1 min
272

घरट्यात दिसले इवलेसे पाखरू ,

होते झेप घेण्याच्या प्रयत्नात..

कोवळे पंख चाचपडत होते..

पाखरू घरट्यात पडले होते ||1||


सावरून पुन्हा उठले पाखरू,

जोमाने उडण्याच्या प्रयत्नात,

फडफडत अनेकदा पंख त्याचे

पुन्हा पुन्हा अनेकदा पडले होते ||2||


मी खिडकीतून पाहत होते,

गमवलेल्या नात्यांचे दुःख घेऊन..

कुतूहलाने माझी नजर वेधून..

पाखरू कायम प्रयत्नात होते||3||


आता अचानक शांतता जाणवली घरट्यात..

वाटले थकले पाखरू आणि हरून गेले..

खिन्न मी पुन्हा आसवांशी,माझ्या 

दुःख, संकटांचा प्रवाह गाळत होते||4||


तितक्यात पुन्हा आवाज आला

कोवळे पंख जोमाने फडफडण्याचा,

दुप्पट जिद्दीने पाखरू उभे होते,

नजर आसमंतास भिडवून होते||5||


पाहून जोम त्या पाखराचा,

शहारे अंगावर येतं होते..

बळ माझ्याच पायांत आले जणू,

तिव्र आशेने मी पाहू लागले ||6||


फडफडत पंख पाखरू काही पाऊले पुढे आले

आत्मविश्वासाने डोळे उघडून आकाशात झेप घेतली..

पाहून ही उत्तुंग भरारी ,माझ्या हातात प्राण आले होते..

नव्या दमाने लढायला शिकवून, पाखरू आज उडले होते..||7||

असे काही घडले होते..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational