STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract Classics Others

2  

Nandini Menjoge

Abstract Classics Others

शब्द

शब्द

1 min
73

शब्द किती हे सोज्वळ

गोडवा वाहे ओसंडून,

फुलवत गोड संभाषण ते

अनोळखी लोकांत मिसळून


शब्द किती हे बोचट

घाव जिव्हारी बोचणारे,

अविवेकी शब्द प्रयोग करता

खोल जखमेने चिघळणारे


शब्द किती हे सहज

विचार योग्य मांडायची,

संवाद रंगावा कां मोडवा

गरज शब्दांच्या समतोलची


शब्द किती हे बहुगुणी

भाषा ही बोलकी होते,

अर्थ विसंगतीने अलंकारीत

अनेकार्थी बोध प्राप्ती होते


शब्द किती हे सर्वव्यापी

अफाट गर्भ ज्ञानाचे,

प्रदेशागणिक रंगरूप शब्दांचे 

अमूल्य स्थान त्यांचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract