ढोंगी या दुनियेत
ढोंगी या दुनियेत
ढोंगी या दुनियेत
सावर ना स्वतःला
वाखवखल्या नजरा
भिडती शरीराला.....!!
जिवाचं काही घेणंदेणं नाही
सगळीकडे दाटला स्वार्थ
वैश्या जरी असली तरी
शोध ना परमार्थ....!!
हतबल झाली बाई ती
त्यात तिचा काय रे गुन्हा
तीच्या भावभावनांच
वाटोळं केलं पुन्हा पुन्हा...!!
मन, अंतःकरण,प्रेम
नसतं कांहीं बाजारात
आत वेगळ्या बाहेर वेगळ्या
वळतात त्याच नजरा....!!
मजबुरीचा फायदा घेत
भेदरतात कशा नजरा
जनाची नाही तर मनाची
लाज वाटू दे ना जरा.....!!
ढोंगी या दुनियेने
दिल्या खूप यातना
भावभावनांची किंमत नाही
उठून बसते कशी वासना....!!
किळसवाणे जगणे नको
आता तूच घे कसून कंबर
छाताडात लाथ घालून
लाव तूच सखे नंबर.....!!

