ईद ए मिलाद
ईद ए मिलाद




आले अपुल्या मनात
ईद करावी साजरी
जातिभेद हा मिटवता
आणे एकत्र मनावरी
ईद असो पौर्णिमा
करावी सर्वांनी सादर
क्लेश नसावा कोणाचा
आनंदाने करावा आदर
राम वसतो अंतरी
मनी रहीम राहतो
रंग कोणताही असो
रक्तामध्ये सर्व भिनतो
चंद्र दिसतो पौर्णिमेला
बघे नजरेने अपुल्या
नका वाटू धर्मात
भासे सर्वा साऊल्या
मनवली मी ईद
माणुसकी ही जगतांना
दोघेही वसतात मनात
रेशीमगाठ ही जुळताना