STORYMIRROR

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Drama Romance Tragedy

3  

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Drama Romance Tragedy

निनावी...

निनावी...

1 min
291

हल्ली कविताही अभावानेच सुचतात.

कधी तरी..एखाद्या मुसळधार पावसाच्या रात्री..

इतर वेळी मी बसलेला असतो कागद

आणि लेखणीशी कुस्ती करत...

कविता सुचली तर तिला नाव सुचत नाही..

मी हजारो झगडे करतो मेंदूशी माझ्या तरीही..

म्हणून 'निनावी'...आपल्या वर्तमानी नात्यासारखी.

पुर्वी कवितांचा समुद्र निर्माण करायचो..नावासह..

तु सोबत होतीस तेव्हा..

तुला काहीतरी विचारायचयं..म्हणून ह्या ओळी..

 नाहीतर मी असतो हल्ली एकांतवासी किल्ल्यासारखा..बुझलेला..

करतेस का गं हट्ट त्याच्याकडेही

अत्तर,पाणीपुरी आणि गजर्याचा?

धरतेस का त्याच्या सोबत अबोला

छोट्याशा नाकावर राग जमवुन??

जातेस का त्याच्याही सोबत

लाईटहाऊसच्या खडकावर?

उध्वस्थ करतेस का त्यानेही बांधलेले

रेतीचे किल्ले असुरी हास्यासह??

हातात कंगवा देऊन त्याच्या, तुझे केस

विंचरायला त्यालाही लावतेस का?

आणि अजुनही तसाच आहे का तो

त्याच्या हातून जेवण भरवुन घेण्याचा वेडेपणा?

त्याच्याही हातावर लिहित असशील ना

तुझे नाव..अगदी गडद?

छातीवर डोके ठेवून ठोके मोजण्याचा खेळ??

तोही असेलच..

सांग मला..त्याच्यावरही तेवढंच प्रेम करतेस

जेवढं माझ्यावर केलं होतंस कधी काळी?

तुमच्या मुलांची नावं तीच ठेवलीस ना?

जी आपण ठरवली होती ठेवायची...(आपल्या मुलांची)...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama