STORYMIRROR

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Abstract Tragedy

3  

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Abstract Tragedy

**" भुजंगवाला मनोहरी सवाल "**

**" भुजंगवाला मनोहरी सवाल "**

1 min
246

एका घामेजलेल्या दुपारी तु...

विसावलेली असशील अलगद..

दिवाणखान्यात,माजघरात किंवा वर्हांड्यात,

गच्चीवरही असशील..अथवा बागकाम??

हाती असेल संपवत आणलेलं पुस्तक..कदाचित.

भिंतीवर असेल बुद्ध..तु रेखाटलेला..

आणखी चार-दोन लाजवाब चित्रे..

तुझ्याच निमुळत्या बोटांनी प्रसरण पावलेली..

सुर्य खिडकीतुन उतरत असेल गोजिरा...

शाळकरी कुजबूज नुक्कडभर असेल...

तुझी कुरळ्या केसांची बट गालावर 

साखरझोपेत असेल बच्चा सारखी...

 चमकदार नाकावरील फक्कड चाळीशी(चष्मा)

उल्हासिली असेल आतील निष्पाप नजरेने...

तु एखादी भन्नाट कविता पुर्णत्वाच्या

प्रांगणात आणुन ठेवली असशील...

कार्यालयातही असु शकतेस तु

लालफितीत या दरम्यान....

किंवा एखादं नाटकं?एखादा सोहळा??

ग्रंथ प्रदर्शन नक्कीच नक्की....

दुचाकीवरुन ईशान्येकडे..हे तर अगदीच शक्य..

मीही असाच असेन बघ....

एखाद्या अभ्यासिकेत,बसच्या चिक्कार गर्दीत,

उन्हात चालत,दुनिया न्याहाळताना,

एखाद्या कोपर्याशी डब्बा संपवताना...

एखादा कारकुन बनलेला??

आणखी काही..आणखी काही....

त्याच दिवसाच्या,त्याच रात्री

चंद्र बघताना...एक सवाल येईल..

तुझ्या दिशेहून..रांगत कानाशी...

तो असेल मन मोहुन टाकणारा...

एखाद्या भुंजगासारखा...दणकट..

'काय रे लठ्ठ मनुष्या??सुखी आहेस ना??',

मी...त्या सवालाला सलाम करतसे...

हो..बिनचूक,अगदीच,शंभर प्रतिशत,

ट्रकभर,जहाजभर,गोणीभर,मणभर...

मी अतोनात खुश आहे....

स्वप्नांची साम्राज्ये खालसा केली...

मी वर्तमानात जगतो...." ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract