STORYMIRROR

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Abstract Fantasy

3  

Vivekanand Mandatai Nivasrao Kumbhar (viu)

Abstract Fantasy

" षडयंत्रातील रमाकांत.. "

" षडयंत्रातील रमाकांत.. "

2 mins
242

 द्रौपदीच्या एकेरी खोलीशी खेटुन

 खिडक्यांशी गप्पा मारणार्या शेवाळलेल्या 

 सहाफुटी कुंपणाच्या त्या बाजुच्या चौकोनात

 लवडलेले आहेत रेतीचे शेकडो ढीग.. 

 पैकी एका पर्वतात रुतलो आहोत आम्ही.. 

 मी आणि इतर कट्टर खेळसोबती..एकवयमानाचे.. 

 हा आमचा किल्ला..सहावीतली कहानी.. 

 कोवळे वय..संथ शहर..पुरेशी मैदाने.. 

समोरच्या घराची पाठमोरी भिंत एक

लांबलचक जाहिरात डिकवुन उभी आहे.. 

 निरमा साबण.. निरमा साबण.. निरमा साबण.. 

 आणि आकाश आहे निळोपंत.. 

रंगाची बालदी कोसळल्यासारखं... 

मी तेच तेच वाचतोय..एका इसमाची आपबिती.. 

 तेलकट मासिक..रमाकांतची गोष्ट.. 

मला सापडले होते ते चाक फिरवताना.. 

जिथे बदामाची खुप झाडे होती..आणि

 यंत्रमागाचा कान बहिरा करणारा आवाज.. 

 रमाकांतला प्रेयसी एकटी टाकुन गेलेली.. 

तो बनला मुर्दांड मुर्ख,पाऊस न आवडणारा गण.. 

आणि त्याने सोडली कविता लिहायची.. 

 आणि तो मरतुकडा झाला.. 

स्वप्नांची गोणी त्याने हवेला देऊन टाकली.. 

 मग तो तिच्या आठवणीत केव्हातरी ठार झाला.. 

त्याच्या वासरीत नोंदवलं होतं प्रेमाचं गाणं.. 

प्रत्येक ऒळींवर प्रियतमेचच नाव.. 

एकत्रित जगायच्या स्वप्नांची यादी... 

      ती सहावीतली एकुणेक 

   मावळत गेलेली सुहानी रात्र.. 

आणि परवा ढासळलेलं तुझं स्वप्न.. 

म्हणजे बघ हं..तु वेगळ्याच गावी राहतीयेस.. 

एका बसस्थानकाच्या पाठीमागे..

पण तरीही फारच लांब..अर्धवट बांधकामाच्या

 दुहेरी गराड्यात...समोर आजन्म मोकळेपणा. 

तुझं घर मी ऒळखलं..बाबांनी हातवारे केले.. 

मी धडकन हाताशी दाबत दामटवली दुचाकी.. 

थेट दारात..बांधकामाच्या आत.. 

 मग अचानक रात्र झाली..तरीही बाबा

दाखवताहेत कुंपणाचे अगदीच व्यवस्थित

झालेले काम विजेरीच्या उजेडात.. 

जावई भला..बँकवाला.. लेक गरोदर..

मी बोंबलत शहरभर धावत होतो.. 

स्वप्न संपलं तेव्हा पहाट सरली होती..

स्वप्नाला आग लागायला हवी होती...

 हत्तीएवढी भिती प्राशन करायला लावणारं.. 

 मी आणखी मागे सरत गेलो तर सापडलं.. 

 आपल्या भटकंतीची रिळं असलेलं कपाट.. 

तुझं हसणं.. तुझं असणं.. तुझे झुमके.. 

 जीव जाळणारे चष्मेवाले डोळे.. लाडके नाक..

आणि उजेडात सुखभरी प्रतिमा करणारे 

  लांबलचक कुरळे केस.. 

कशी कडेवर घ्यायचीस ना माझ्या शब्दांना

माझ्या ही पेक्षा अचुकपणे..

आणि माझ्या अगावुपणाचं प्रतिक म्हणुन

तुझ्या प्रशीतकावरील मधाचा मोठ्ठा डब्बा.. 

केवढी स्वप्ने.. केवढी पुस्तके..केवढं सुख..

 तु गेलीस एखाद्या जवानीसारखी.. 

आस्तेकदम.. हळुहळू राख बनवत... 

खरं सांगु का? तुझ्यासह आयुष्य वेगळं असतं.. 

 जुना झालेला मधही वारेमाप चविष्ट लागतो.. 

 पण जे आहे ते हे आहे.... 

  माझा रमाकांत झालाय... ".. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract