"डेडी..."..
"डेडी..."..
जलतरणावरील सिध्दू वडीलांना..
पुकारतो डेडी..लाडिकपणे...
तेव्हा खुबसुरत असणारे त्याचे
डोळे भासतात सुरक्षित, आशादायी..
डेडी कचोरी.. डेडी कुल्फी..पुकारा..
त्या खुशीने मी आणखी पोहतो...
सुर्य जवान होतो..वारा बेशिस्त बनतो..
मनाच्या पटलावर कहाणी पेश होते..
पप्पा गेले तेव्हा मी एैन तेवीशीचा होतो..
आई कोलमडली होती..वटव्रुक्ष गेल्याने..
मी म्रुत्युला हाका मारत बसलो होतो..
तो आलाच नाही..
येणारच नव्हता..येणारही नाही..
एका क्षणाने साला थोराड बनवुन टाकलं..
स्वप्ने खतम..जगणं चालु..अर्धवट पुर्णविराम.
एका वैश्विक सत्यानं काळ चिरत नेला...
मी दुनियादारीत सामील झालो..
काल माझा.. उद्या त्याचा..
श्रुंखला टिकावुच राहील..
कोणाचाच बाप गड्या अमर नाहीये.. "