निःशब्द
निःशब्द
तो- तुझी आठवण असते प्रत्येक क्षणाला
तुझ्याशी बोलल्यावरच मिळतो आराम मनाला
ती- हाल जसे तुझे तशीच अवस्था माझी आहे
मन माझं असूनही आठवण मात्र तुझी आहे
तो- नको घालूस आवर मनाला
आता थोडीशी हिम्मत कर
येऊन भेटण्यासाठी मला
स्वतःच स्वतःची थोडी मदत कर
ती- कासावीस मी ही झालीये रे
माझ्यासाठी इतकंच कर
येईल मी नक्कीच
फक्त थोडासा धीर धर...