मी कोण
मी कोण
मी कोण आहे हे मलाच माहीत नाही,
कधी मी माझ्या वडीलांच्या नावाने ओळखले जात होते ,
आता मी माझ्या पती च्या नावाने ओळखले जाते.
आस का मी माझ्या मनाला विचारत असते ,
आपली ओळख एवढीच आहे का?
का एक मुलगी स्वतःची ओळख निर्माण करू शकत नाही
लग्नाआधी तिच्या बाबतीत सगळे निर्णय वडील घेतात.
लग्नानंतर पती घेतात का?
ती योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवत नाही का?
का मी कोण आहे हे मलाच माहीत नाही
की मला हे माहीत करता आलं नाही
