आई बाबांची शिकवण
आई बाबांची शिकवण
मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून ,,
अलिप्त सौसार थाटू नको.
स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने,,
सासरच्या नात्यास छाटू नको.
आई झाल्यावर मुली तुला,,
आईपणा चे भान राहूदे.
एकत्र कुटुंबाचे संस्कार ,,
त्यांच्या मनावर ही होऊ दे.
सासूशी उडणाऱ्या खट्क्यात,,
मुलांना उगाच ओढू नको.
आजी नातवाच्या नात्यावर,,
त्याचा राग काढू नको.
ससऱ्याच्या म्हातारपणावर,,
रागे वैतागे घासरू नको.
नव्या जुन्या मधील दुवा,,
तूच आहेस हे विसरु नको.
अगदी या भावाप्रमाणे,,
दिराशीही तुझे भांडण होईल.
तूझ्या लाडक्याना खेळणी,,
हाच काका घेऊन येईल.
लहान असो की मोठी,,
नणंद चेष्टेने त्रास देणारच.
मांडीवर घेऊन तूझ्या मुलांना,,
काऊ चिऊ चा घास भरवणारचं.
घरातल्या शुल्लक कारणावरून,,
वाद घालून काय करशील.
आग जशास तसे उत्तर देऊन,,
घराचं घरपण मारशील.
तुझे माझे भेदभावाने,,
जावेच्या मुलांना अंतर देऊ नको.
तीच्या लाडक्यानाही दोन घास,,
जास्त देण्यामागे बघू नको
नातेवाईकांना धरून राहिलीस तर,
सर्वांच्या मनात घर करुन राहशिल.
तुझ्या पाखरांची ऊंच भरारी,,
तु सर्वांसोबत पाहशील.
शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर,,
मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाही.
तूझ्या म्हातारणाचे दिवस ही,,
वृध्दाश्रमात जाणार नाहीत.
