शेवटचं पान वहीचं
शेवटचं पान वहीचं
ना राजाची ना राणीची, ही गोष्ट आपल्याच खुणांची.
त्यात काय विशेष वाटल जरी, ही तर कहाणी शेवटच्या पानाची......
पान शेवटचं पण पहिल्याच वहीच, नुकत्याच ओळखलेल्या चित्राच....
नकळत गिरवलेल्या आक्षरच, मस्तीत ओढलेल्या रेघोट्यांच.....
पान शेवटचं हे शाळेचं, कच्च्या गणिताचं,
चुकलेल्या स्पेलिंगच, अपूर्ण टाईम टेबलच....
शेवटचं पान त्याच्या वहीच, तिच्या आठवनींच,
अस्वस्थ कवितांचं, अन् मनात लपलेल्या प्रेमाचं...
आता कोरचं पान शेवटचं, वादळी जीवनाचं,
कधी निशब्द शांततेचं, अन् शेवटी या अथांग मनाचं....
आहे का तुमच्या जिव्हाळ्याच, नकळत कुठं सुटलेलं,
जुनाट रद्दीत पडलेलं, पान एखाद शेवटचं.......
