STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Drama Classics Inspirational

3  

Annapurna manoj Lokhande

Drama Classics Inspirational

माझ्या बाबांचे मनोगत

माझ्या बाबांचे मनोगत

1 min
148

नाही ऐकली मी कीलकरी तुझ्या रडण्याची,

करत होतो तयारी तेंव्हा hospital च्या बिलाची


जन्माला येताच तु मी समजू लगलो स्वतःला राजा

तेंव्हा पासूनच भविष्याची चिंता खलवत होती तुझ्या


हळूहळू गोड माझी मोठी होऊ लागली

या बापाच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली


संस्कार चांगले देण्यासाठी कठोर ही मी झालो

जिवापाड प्रेम करण्यासाठी मागे ना कधी सरलो


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लागली तूझ्या लग्नाची घाई

राजकुमार शोधा माझ्या मुलीला म्हणू लागली तुझी आई


एक एक पैसा जोडला मी तुझ्या लग्नाला

काही कमी पडू नये म्हूनुन तुला दिवस रात्र मी एक केला


कन्यादान करण्याचे आज भाग्य लाभले मला

आयुष्य भर सुखी राहो हाच आशीर्वाद तुला


लग्नमंडपात तुझ्या डोळे माझे पणावले

पाठवणीला जेव्हा गोड तुला दुसऱ्याच्या हाती सोपवले


विसरणार तर नाही ना गोड कधी तुझ्या या धडाकेबाज बापाला


येशील ना तू धाऊन सोन्या माझ्या शेवटच्या हाकेला....

माझ्या शेवटच्या हाकेला........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama