पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पहिलं प्रेम होत माझं ते
जे माझ्या नजरे समोर होत
अशी फिलिंग होती मनात
की माझ्यासारखं कुणीच केलं नसेल
ते माझ्यासाठी किती महत्त्वाचं होत
हे शब्दात सांगणं कठीण आहे
पहिल्या प्रेमाच्या आठवणी
किती सुंदर असतात
शाळेतले ते दिवस अचानक नजरे समोर येतात
आपण आपल ते आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा देऊन जातात
त्या वयात समजत ही न्हवत की ते प्रेम आहे
त्या व्यक्तीला पाहण्यासाठीची ओढं
वेड करून टाकणारी होती
वरगातला गोंधळ, माझ्या मनाच्या त्या शांतते पर्यंत पोहचू शकला नाही
येवढ्या गोंधळात कोणाचं काय तर कोणाचं काय
पण माझी नजर त्याच्यावरच
एक नजरेने त्याच्याकडे पाहण
तो आपल्याकडे बघताना पटकन नजर चोरन
बोलण्यासाठी रोज काहीतरी बहाणा करन
पुस्तक असून त्याच्याकडे मागणं
वही पूर्ण असून त्याच्याकडे वही मागणं
आणि त्या वहिला कधीच स्वतः पासून लांब न करन
शेजारच्या बेंचवर बसण्यासाठी धडपडन
पहिल्यांदा शेजारी बसल्यावर मनातल्या मनातच घाबरन
मनात अस वाटत होत की जे मला वाटत ते त्यालाही वाटत असेल का
कधी कधी त्याच्या बोलण्यातुन याचं उत्तर मिळत होत
मनात दोघांच्या ही होत
सांगायचं कोणालाच न्हवत
सांगितलं तर जी मैत्री आहे
तीही तुटेल या भीतीने. आणि बोलणच बंद होइल या भीतीने
माझं ते पहिलं प्रेम मनातल्या मनातच राहून गेलं

