झाड
झाड
एका अस्तित्वाची परिपूर्णता,
म्हणजे झाड
जाणीव व अहंकार दूर ठेवलेलं जीवन,
म्हणजे झाड
भीतीच्या स्पर्शाच्या लवलेश जिथे नसतो,
ना भय उनाच्या झळाचे,
ना वादळाच्या तडाख्यांचे ,
कसल्याही अकक्षांनी अस्पृश्य,
म्हणजे झाड
सावलीसह देह ज्याचा,
विश्रांतीस्थान म्हणुन अर्पण,
म्हणजे झाड
आपण तापाचे चटके सोसून,
छाया पुरविण्याचं परमार्थ साधणार,
म्हणजे झाड
ना स्वतःच्या मताचा आग्रह,
ना इच्छा कोणाच्या सल्ल्याची,
स्वेच्छेने संपूर्ण विसर्जन,
म्हणजे झाड
बस्
एक निरपेक्ष अस्तित्व,
म्हणजे झाड.........
