STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Drama Classics Inspirational

3  

Annapurna manoj Lokhande

Drama Classics Inspirational

माझ्या बाबांचे मनोगत

माझ्या बाबांचे मनोगत

1 min
189

नाही ऐकली मी कीलकारी, तुझ्या रडण्याची

करत होतो तयारी, hospital च्या बिलाची


तु जन्माला येताच मी, समजु लागलो स्वतःला राजा

तेंव्हा पासूनच भविष्याची चिंता, खलवूलागली तूझ्या


हळूहळू गोड माझी मोठी होऊ लागली

या बापाच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली


संस्कार चांगले देण्यासाठी कठोर मी झालो

तुझ्यावर प्रेम मी अतोनात करू लागलो


शिक्षण पूर्ण होताच लागली तूझ्या लग्नाची घाई

राजकुमार शोधा माझ्या मुलीला म्हणू लागली तुझी आई


एक एक पैसा जोडला मी तुझ्या लग्नाला

कमी नको पडायला काही म्हणुन हात जोडले कित्तेकाला


कन्यादान करण्याचे आज भाग्य लाभले मला

आयुष्य भर सुखी राहो हाच आशीर्वाद तुला


लग्न मंडपात तुझ्या डोळे माझे पाणावले

लाडक्या माझ्या गोड ला जेव्हां दुसऱ्याच्या हाती सोपवले


विसरणार नाही ना गोड तु तुझ्या धडाकेबाज बापाला

नक्की येशील ना धाऊन तू माझ्या शेवटच्या हाकेला..

माझ्या शेवटच्या हाकेला......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama