ही त्या दिवसांची गोष्ट आहे
ही त्या दिवसांची गोष्ट आहे
ही त्या दिवसांची गोष्ट आहे
जेव्हा प्रेम खर होत
ही त्या दिवसांची गोष्ट आहे
जेव्हा प्रेमात पडने चांगले होते
राहिलं मनातल्या मनातच ते प्रेम
जे मनात असूनही मान्य करण्याची रीत न्हवती
ही त्या दिवसांची गोष्ट आहे.....,
का हळूच चोर नजरेने,
मी सारखं तुझ्याकडेच बघू
का तुझ्याच आसपास मी राहू
तुला भेटून लांब जान वाईट वाटत
का खुश होते मी,
तुला हसताना बघून
ही त्या दिवसांची गोष्ट आहे.....,.
पुस्तकं वाचायची कुठच राहिली आता,
मी तुलाच वाचुलागले
शाळेच्या निमित्ताने मी,
तुझ्यासाठी घराबाहेर पडू लागले
कधी खोटं बोलले न्हवते,
पण आता बहाने बनवू लागले
हि त्या दिवसांची गोष्ट आहे.,......
पुस्तक असून माझ्याकडे,
तुझ्याकडून मागू लागले
शेजारच्या बेंचवर बसण्यासाठी,
शाळेला लवकर येऊ लागले
कधी कधी तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासाठी,
मुद्दाम शाळेत उशिरा येऊ लागले
ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा हे सगळे क्षण खूप मोलाचे होते .,..

