मीराची व्यथा
मीराची व्यथा
हे कृष्णा,
आता तरी मला तुझ्या बासुरीचा आवाज ऐकव ना.
मी तर तूझ्या प्रेमात वेडी झाली आहे,
तू मला समजून घे ना.
जेव्हा माझ्या डोळ्यांनी तुझ्या डोळ्यात पाहिलं,
तेव्हा पासून ना आई ना बाप सगळी नाती विसरली आहे.
तुला भेटण्यासाठी आतुर आहे माझा जीव,
आता तरी तू मला भेट ना.
समुद्रा पेक्षा ही खोल माझं प्रेम आहे तुझ्यावर,
ना लोकांचा ना समाजाचा विचार केला,
ना लाजले ना हि घाबरले कोणाला.
माझ्या प्रेमापासून आरे मनमोहना,
नको राहुस तू लांब.
हे कृष्णा आता तरी मला तुझ्या बासुरीची मधुर संगीत एकव ना.
तुझ्या प्रेमात वेडी झाली मीरा,
तिला तु ओळखणा..
मधुर संगीत ऐकव ना.. हे कान्हा.. हे कृष्णा... आरे मन मोहना ....

