आजची दुनिया सारी
आजची दुनिया सारी
अशी कशी ही
डाव करणारी दुनिया सारी,
शरीर सुखरूप ठेवुनी
घाव घाली जणु काळजावरी...
आयुष्याच्या या वाटेवरती
लोकांचे नेहमीच पहायला मिळतात इथे भेदभाव,
क्षणार्धात आपलसं करून फसवणारे
हेच ते मुखवट्या पलिकडचे हावभाव...
खोट्या हावभावांसोबत न उलगडणारी
माणसांची मने का बरं ! हृदयात जपायची,
अहंकाररूपी, आत्मसन्मान जपणाऱ्या
त्या सोबतीची आशा हृदयात का ?म्हणुन बाळगायची...
जोडल्या जाणाऱ्या नवनव्या
नात्यांसमवेत का? रचावेत क्षणार्धात कोसळणारे प्रेमाचे मनोरे,
माहित असुनही ह्या मनाला; इथे काा ? जपावे कुणाला
जिथे कुणीच नाही आपणास विचारणारे...
