" रिमझिमणारा पाऊस "
" रिमझिमणारा पाऊस "
खट्याळ घोंघावणाऱ्या वाऱ्यासवे
नभी विजा देखील कडाडल्या,
मृग नक्षत्राच्या चाहुलीने माळरानावर
मयुर ही थुईथुई नाचु लागला...
अवखळ रिमझिम बरसणाऱ्या सरी
चराचराला आज भिजवित सुटल्या,
स्पर्शाने त्यांच्या भुईवरी हरिततृणांच्या
जणु शालीच पांघरल्या...
डोंगराच्या कडेकपारीतून
लाल तपकिरी रंगाचे झरे देखील खळखळले,
वाफाळत्या चहापरी शेतमळे
सारे तुडुंब भरले...
किमया जणु थेंबाथेंबांची पाहता वाटे
पानापानांवर झळाळले मोती,
इंद्रधनुचे रंग ते दृष्टीस पडता वाटे
पावसासारखा नाही रे कुणी दुसरा सोबती..
