STORYMIRROR

Saishankar Parab

Inspirational Others

3  

Saishankar Parab

Inspirational Others

"कोकण" जीवच तो दुसरा

"कोकण" जीवच तो दुसरा

1 min
667

स्वप्नांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन मन माझे

तुझ्यातच रमुन जाते,

निसर्गाच्या सौंदर्याचा 

वरदहस्त लाभलेले रूप ते तुझे

नेहमीच मनाला खुणावते...


अफाट जणु ही नैसर्गिक संपत्ती

कवेत तुझिया कशी खुलुन दिसते,

जेथे नजर जाईल तिथे 

पावलागणिक मन मात्र फक्त

सुखच अनुभवते...


उंच उंच डोंगररांगा 

त्यात नागमोडी रस्त्यांची वळणे,

प्रवासात म्हणुनच थोडे सावकाश गेलेले बरे,

अनुभवायला मिळतील सुमधुर पक्षांच्या

किलबिलाटासह ऐकु येतील 

खळखळ वाहणारे झरे...


सोबतीस तुझ्या असलेला 

निळा विस्तीर्ण हा दर्या

नेहमीच मनाला भुरळ पाडून जातो,

त्याला पाहता थकलेल्या जिवाचा क्षीण

सारा नाहीसा होतो...


लालबुंद तुझ्या या मातीत 

तांदुळ, वरीचे जणु मळेच बहरतील,

परप्रांतीय सुद्धा हापूसच्या ओढीने 

तुझ्या कवेत नक्की परततील...


फणस, करवंद, जांभुळ, काजु

हाच निसर्गाने दिला जणु आम्हांस 

अनमोल ठेवा,

तुझ्याच नावाने प्रसिद्ध झालेला हाच

तो कोकणचा "रानमेवा".


महती तुझ्या कर्तृत्वाची समजुनी

आजच्या तरुणाईने तुला जपण्याचे 

आव्हानच स्वीकारले,

सोशल मीडियाच्या या जगात तुझे स्थान 

अजुनच वर्चस्वास नेऊन ठेवले...


नेहमी हवीहवीशी वाटणारी 

ओढ तुझी दुर कुठे असता

नेहमी डोळ्यांना पाणावते,

काय सांगु रे वेड्या मना आता तुला

तुझे सौंदर्यच असे की,

कुणालाही आपल्या प्रेमात पाडते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational