STORYMIRROR

Saishankar Parab

Abstract Fantasy Inspirational

3  

Saishankar Parab

Abstract Fantasy Inspirational

सुधाकर

सुधाकर

1 min
290

नभही थोडेसे धुसर होते

कारण पयोधराच्या पुंजक्यानी

त्याला अगदी गच्च वेढले होते,

त्याच पयोधराच्या पुंजक्याना

बाजुला सारणारे नभाच्या

सोबतीला मात्र कुणीच नव्हते...


त्याच्या येण्याची वेळ झाली हे पाहता

नभही थोडेसे उदास झाले,

त्याची उदासवाणी असलेली तळमळ पाहता

"कुण्या एकाचे" डोळे देखील पाणावले...


"कुण्याएक" हा दुसरा तिसरा कुणी नसुन

चहू दिशांना घोंघावणारा जणु अनिलच होता,

न सांगताच नभाच्या सोबतीला असणारा 

त्याच्यासारखा मात्र दुसरा कुणीच नव्हता...


अनिलच्या प्रेमळ, लडिवाळ फुंकरीने

"पयोधर" ही शहाण्यासारखे 

अलगद पुढे सरकले,

नभ दाखवू पाहणाऱ्या सुधाकराचे दर्शन

अखेर जिवलगाच्या निर्मळ डोळ्यांनादेखील झाले....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract