STORYMIRROR

Saishankar Parab

Romance Fantasy

3  

Saishankar Parab

Romance Fantasy

तूच रे सख्या

तूच रे सख्या

1 min
266

तिच्यासाठी अलंकारिक शब्द 

सुचले गेले की, हदयाची स्पंदने उगाचच

कल्लोळ माजवतात, 

परंतु त्यांचही काही चुकत नसतं कारण त्या

नेहमीच मला तुझी आठवण करून देतात...


आठवणीतुन बघ सुचले शब्द 

काही तुझ्यासाठी अन् तुझ्यावरच्या

प्रेमासाठी,

कारण तिच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा 

आहेस तु माझ्यासाठी...


स्मरता तुला राजसा

सारी सृष्टीच माझी रंगुनी जाते,

फाल्गुनातली रंगपंचमी ही

त्यासाठी मात्र निमित्त असते...


पाहिले जरी ना मी तुला 

तरी तुझ्या प्रेमाचा रंग नकळतच

माझ्या गालावरी चढतो,

सप्तरंगाने खुललेला देह हा तुझा

माझ्या मनास अजुनच 

भुरळ पाडुन जातो...


तिच्याहातुनी रंग माझ्या गाली लागता 

वेगवेगळा आभास माझ्या मनाला

देखील होई,

पाहता वेड्या सख्या रे तुला 

देह माझा तुझ्याच सप्तरंगात 

न्हाऊन जाई...


का? रे सख्या तुच माझ्या नयनांना

भाळलास असा,

जणु साऱ्या सृष्टीस बहरून नेणारा

वसंत हा ऋतु जसा...

साऱ्या सृष्टीस बहरून नेणारा

वसंत हा ऋतु जसा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance