STORYMIRROR

Saishankar Parab

Inspirational

3  

Saishankar Parab

Inspirational

निसर्ग एक आविष्कार

निसर्ग एक आविष्कार

1 min
268

विहरणाऱ्या पक्ष्यासोबत

नभा तुझे सौंदर्य जणु खुलुन दिसे,

पहाट समयी उगवत्या सूर्याकडे पाहता

डोळ्यांना सोन्याची झळाळी भासे...


रंगीबेरंगी फुलपाखरांनी आकर्षित

करणारी ती हिरवीगार झाडे,

नाचरा साजरा मोर जणु

त्या झाडांमागे दडे...


धुंद बेभान वाऱ्यासोबत

बरसणाऱ्या त्या हिऱ्यांपरी धारा,

मखमली परिमळाने दरवळला 

आसमंत सारा...


डोंगराच्या कुशीतून वाहणारी ती सरिता

जाऊनी मिळते दर्या सागरा,

बहरलेल्या झाडांच्या फांद्यांवर

पाहायला मिळतो फुला-फळांचाच पसारा...


संध्यासमयी अवकाशी लुकलुकणाऱ्या

त्या लाजिऱ्या साजिऱ्या चांदण्या,

सुधांशू सोबत दिसती 

सोज्वळ जणु देखण्या...


शब्द माझे अपुरे पडतील 

वर्णु किती मी आज ह्या निसर्गाची महती,

ईश्वरा तुझ्याच या निर्मितीची

चहुदिशांना गाजे आज कीर्ती...


तुच या साऱ्याचा शिल्पकार,

अन् तुच आहेस मानवाचा जीवनाधार...


लाज बाळग मानवा आता थोडीतरी

लाज बाळग...

न जाणिलेस तु कधी या

निसर्गरुपी आविष्काराचे महत्व,

निसर्ग कधी दिसलाच नाही तुला

जपलेस तु फक्त तुझे स्वार्थी

अहंकारी कर्तृत्व...


स्वफायद्यासाठी केलीस तु ईश्वराने

बहाल केलेल्या ह्या निर्मळतेची कत्तल,

भूकंप, महापुर, रोगराई यांसारख्या 

आपत्यांमुळे घडतेय बघ तुला आज

चांगलीच अद्दल...


हे विकृत बुद्धीच्या मानवा

सोड सारा अहंकार तुझा

अन् वाचव ही वसुंधरा,

जीवनातला हा अंधकार सारा मिटूनी

लाभेल तुला निर्मळ वात्सल्याचा किनारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational