सख्या तूच रे दारी फुलता
सख्या तूच रे दारी फुलता
वाटे असे मनाला जणू
चांदण्यांची बरसात अंगणात माझ्या झाली
सख्या तूच रे दारी फुलता,
निखळतेने हास्य माझे फुलले
हिमशुभ्रापरी रूप तुझे हे पाहता...
सुगंधापरी ऐकु येवो नेहमीच तुझ्या
प्रशंसेची वाणी,
त्याच वाणीतुन सुचू दे तुलाच
उपमा देणारी मंजुळ अशी गाणी...
म्हणता म्हणता गाणी तुझी
परडी माझी भरली सख्या तुझ्याच शुभ्र कळ्यांनी,
त्याच कळ्यांचा गजरा जणु केसात
तिच्या माळुनी पाहिन रमणीय रुप
तिचे मी माझ्या डोळ्यांनी...
रमणीय रूप जरी तिचे पाहिले तरी
चांदण्यापरी असलेले रूप तुझे
नजरेआड काही होत नाही,
आनंद अन् विरहात जो कोणी सोबत
असेल तोच सदैव सृष्टीच्या आठवणीत राही...

