STORYMIRROR

Saishankar Parab

Romance

3  

Saishankar Parab

Romance

वाफाळता चहा

वाफाळता चहा

1 min
745

फारसा तसा योगायोग नाही

आला दोघांनमधल्या संवादाचा,

त्या सर्वांमध्ये एक हात

तुझा देखील होता सोबतीचा...


राग, रुसवे सारे विरले

स्पर्श होता तुझ्या प्रेमळ मिठीचा,

न विसरण्यासारखा अनुभव तुझा

दर्याच्या कुशीतल्या निवांत वेळेचा...


आज त्याला पाहता तु ही आठवलास

आस्वाद घेता पावसाच्या सरींचा,

खरं तर आवडायचा नाही तो मला पण;

प्रयत्न कधी केला नाही

प्रेमळ आग्रह तुझा डावलण्याचा...


बरसत्या सरींसोबत उजाळा दिला

आठवणींना

झेलित सरी पेला भरला मी

वाफाळत्या चहाचा,

पेला भरला मी आठवणींचा

इवलुश्याच त्या गोड मैत्रीचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance