STORYMIRROR

Milind Kambere

Drama Romance

3  

Milind Kambere

Drama Romance

हॅप्पी प्रपोज डे

हॅप्पी प्रपोज डे

1 min
185

❤️💛💝💛❤️💘❤️💛💝💛❤️💘❤️💛💝💛❤️

तू या वेड्या जीवाची, वेडी अभिलाषा

कधी समजेल का गं तुला

माझ्या प्रेमाची भाषा ?

❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️

तू फुल हो, मी सुगंध होईन,

तू काव्य हो, मी शब्द होईन,

तू गीत हो, मी सूर होईन,

तू चंद्र हो, मी नूर होईन...

तुला स्मरूनी रंगती ह्या, बेधुंद दाही दिशा

कधी उमजेल का गं तुला

माझ्या प्रेमाची भाषा ?

❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️

हा हरेक श्वास माझा

तुझेच स्वप्न पाहतो

विरहात तुझ्या आसवांचे

कैक पाट वाहतो

व्यथा या विरहाच्या, मी मांडू तरी कशा ?

कधी समजेल का गं तुला

माझ्या प्रेमाची भाषा ?

💞❣️💞❣️💞❣️💞❣️❣️💞❣️💞❣️💞

तुझ्याविना अपूर्ण मी

निरर्थक हे जीवनही

तुझ्या मिठीत कबूल मजला

प्रसंगी मरणही !

तुला पाहुनी पूर्णत्वाच्या, होती पल्लवित आशा

सांग ना, कधी उमजेल का गं तुला

माझ्या प्रेमाची भाषा ?

❤️💛💝💛❤️💘❤️💛💝💛❤️💘❤️💛💝💛❤️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama