STORYMIRROR

Milind Kambere

Others

3  

Milind Kambere

Others

माझं तुफान प्रेम

माझं तुफान प्रेम

1 min
201

माझं प्रेम पहिल्या पावसासारखं नाही

रिमझिम रिमझिम

माझं प्रेम तुफान आहे

तुला झेपणार नाही

प्रेम करायला काय लागतं ? 

विश्वास, काळजी ? छे ! 

प्रेम करायला धाडस लागतं...

आणखी एक सांगू.. सातत्य हवं

हंगामी प्रेम तेव्हढ्यापुरतंच सुख देऊ शकतं

आयुष्यभराच्या सोबतीसाठी 

संपूर्ण समर्पण हवं

आणि मैत्री हवी..कारण 

मैत्रीमध्ये आपण एकमेकांना गृहीत धरत नाही

तू आता प्रेम करशील..

     मग गृहीत धरशील...

        मग सोडून जाशील.. 

सावरावं लागेल ते माझं मला

आणि हो ! तुझ्या सोडून जाण्याचं

कारण सुद्धा हेच असेल

'माझं तुफान प्रेम' 

जे नाही झेपणार तुला

म्हणून सांगतो, आताच माघार घे !

जा रिमझिम पावसात भिज...


Rate this content
Log in