Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Milind Kambere

Children Stories Fantasy Others

3  

Milind Kambere

Children Stories Fantasy Others

हॅप्पी टेडी डे

हॅप्पी टेडी डे

1 min
161


💛💙💝💘💛❤️🐻💘🐼 💛❤️💞💝💙💛

मला ना तुझा तो टेडी व्हायचंय !

तुझ्या सुखदुःखात तुझ्या सोबत राहायचंय !

💝🐻💝

कधी नाराज असलीस तू

तर तुला गोड गोड हसवायचंय

कधी चिडली असशील तू

तर तुझ्याशी खोटं खोटं भांडायचंय

💝🐼💝

आईने रागावल्यावर, बाबांनी ओरडल्यावर

प्रेमाने तुला मनवायचंय

तुझ्या मैत्रिणी सोबतच्या भांडणात ही

तुझ्याच बाजूने उभं राहायचंय

💝🐻💝

"अय्या ! आज काय झालं माहित आहे ?"

"नाही गं बाई !" पण मला सर्व जाणून घ्यायचंय

तुझी दिवसभराची बकबक,बडबड, तुझं बोलणं

सारं काही रात्री शांतपणे ऐकून घ्यायचंय

💝🐼💝

जेव्हा तुला एकांतात रमावसं वाटतं

तेव्हा तुझा एकांत मला व्हायचंय

मग कधी कधी नाचतेस बघ तू एकटीच

तेव्हा तुझा डान्स पार्टनरही व्हायचंय

💝🐻💝

कधीकधी असंच विनाकारण तुला बिलगायचंय

रात्री अलगद तुझ्या कुशीत निजायचंय

खरंच इतकं इतकं स्पेशल व्हायचंय

मला ना ! तुझा तो टेडी व्हायचंय

💛💙💝💘💛❤️🐻💘🐼 💛❤️💞💝💙💛


Rate this content
Log in