जोडुनी नाते (गझल)
जोडुनी नाते (गझल)
जोडुनी नाते मागे फिरणे जमले नाही
विरहाने कालच्या प्रेम करणे थांबले नाही
नाते कोणते हे अनोखे मनाचे मनाशी जुळले
रिते होता होता भान जगाचे उरले नाही
वाटते तिजला मी दिवाणा तिच्या रूपाचा
सौंदर्यावर तिच्या मन वेडे कधीच भाळले नाही
लोटले पूर आसवांचे सारे नकोसे झाले
जीवनाचे गणित हे आजवर कळले नाही
लागले जव ग्रहण चंद्रास माझ्या
जाणुनी सारे मी वेध पाळले नाही
लाख आक्रोश करुनि लोटते मज ती दूर
तिच्यासाठी झुरताना अद्याप तिने मजला पाहिले नाही
हसू उमटावे गाली तिच्या एवढीच माफक अपेक्षा
महादेवानेही म्हणणे माझे मुळीच टाळले नाही
