STORYMIRROR

Milind Kambere

Abstract Romance

3  

Milind Kambere

Abstract Romance

हॅप्पी चॉकलेट डे

हॅप्पी चॉकलेट डे

1 min
237

❤️💛🍫💛❤️🍫❤️💛🍫💛❤️🍫💛❤️🍫❤️💛

ऐक ना,

मला ना तू चॉकलेटच वाटतेस !

तुझा हात हाती घेतल्यावर

नजरेला नजर भिडल्यावर

व्याकुळ तुझी नजर

शरमेने खाली झुकवून

विरघळणाऱ्या चॉकलेटप्रमाणे जेव्हा

तू ते जीवघेणं लाजतेस

तेव्हा ना तू मला चॉकलेटच वाटतेस...

तुझा मृदू आवाज

काळजाचा ठाव घेतो

तुझ्या शब्दांतील गोडवा

मनाला भुरळ घालून जातो

'ऐक ना मन!' असं म्हणत

जेव्हा तुझ्या मेलडी व्हॉइस ने

तू मला लाडीगोडी लावतेस

तेव्हा ना मला तू चॉकलेटच वाटतेस...

तुझ्या सुरांचा तर मी दिवाणाच आहे

रोज गाणं ऐकण्याचा माझा बहाणाच आहे

प्रेमाच्या बहारदार मैफिलीत

Dairy Milk, Kitkat ला ही लाजवेल

असा गोड तुझा आवाज आहे

मग माझी आठवण आल्यावर

पटकन मला कॉल करून

'एकदाच यावे सखया' जेव्हा तू गातेस

ऊफ.. तेव्हा ना मला तू चॉकलेटच वाटतेस

तुझ्या मनात येईल तेव्हा चिडतेस,

रुसतेस, फुगतेस, उगाच रागावतेस..

चूक तुझी असो वा माझी

मलाच सॉरी बोलायला लावतेस

पण कधी कधी नाही घेत माघार मी

असं वाटतं, तुझ्या मनावर उगाच भार मी..

तुला खुश ठेवणं,

मला। जमत नाही का काय ?

रोज ... रोज ... चुकतंय

सगळं संपवून टाकू की काय ?

पण तितक्यातच, श्शू..!!!! असं म्हणत...

मला शांत करतेस

बोलक्या ओठांनी तुझ्या

मला अबोल करतेस

मग जाता जाता उगाच

I HATE YOU.. असं म्हणत

जेव्हा तू नाक मुरडत जातेस...

आईशप्पथ तेव्हा ना तू मला

चॉकलेटपेक्षाही गोड वाटतेस

❤️💛🍫💛❤️🍫❤️💛🍫💛❤️🍫💛❤️🍫❤️💛


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract