STORYMIRROR

Raakesh More

Drama Classics Inspirational

3  

Raakesh More

Drama Classics Inspirational

आई

आई

1 min
179

कितीही शिकली तरी आई 

अशिक्षितांसारखी वागते 

दोन मागितल्या तर डब्यात 

चार चपात्या टाकते || 0 ||


आईला बेरीज वजाबाकी 

करता येत नाही 

डब्यात मोजक्याच चपात्या 

भरता येत नाहीत 

जखम मला झाली तर 

तिची वेदना जागते 

दोन मागितल्या तर डब्यात 

चार चपात्या टाकते || 1 ||


घरातला खाऊ खाण्याचं 

नाटक ती करते 

वाचवलेला खाऊ ती 

माझ्या डब्यात भरते 

आठवण काढली तर 

तिला उचकी लागते 

दोन मागितल्या तर डब्यात 

चार चपात्या टाकते || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama