कधी कधी
कधी कधी
कधी कधी चांगलं पण वाटतं जगायला
कधी कधीच..
काही काळासाठी का होईना
पण गोष्टी होतात मनासारख्या
मन शांत होते आणि दिवस
दिवस सहज सरळ जातात
कधी कधी..
स्वतःची आठवण होते मग
स्वतःसाठी वेळ मिळतो अचानक
आपण आहेत आपण करतोय बरोबर काहीतरी
श्वास सुटतात सहज कळतं
कधी कधी..
हळुवार जातात क्षण
किंवा आपलं लक्ष जात त्यांच्याकडे
काही क्षणच असतात ते पण
खूप काळ मग पुढे लक्षात राहतात
चांगलं वाटतं कधी कधी..
