STORYMIRROR

Aditya Yadav

Drama Fantasy

3  

Aditya Yadav

Drama Fantasy

नादात माझ्या खुशाल आहे

नादात माझ्या खुशाल आहे

1 min
318

आज केव्हा तरी अचानक जिंकलेला असतो मी

काल तेव्हा जरी उगाचच हरलेला असतो मी


मी असाहा बिनभरोशी नादात माझ्या वागतो 

भेटेल त्यांस वर्णन माझे नेहमी वेगळे सांगतो 

शोधतो मी मज स्वतःला सारखा हररोज जरी

घावतो अन मग मी स्वतःला मुक्त करुनी टाकतो 


का समजण्या येता मजला मी असाच आहे

समजून घेण्यापरी जगाला निवांत मी जगत आहे 

अर्थ माझे वेगळे मार्ग माझे वेगळे राज माझे वेगळे

दंगेल या दुनियेत मी मनात शांत आहे 


हा माझा प्रवास आहे मी असाच जगणार आहे 

थांबणार मीच अन सतत मीच चालणार आहे

कोणी न यावे मज मधी मी प्रवासी बेफाम आहे

शेवटाकडे चालताना नादात माझ्या खुशाल आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama