STORYMIRROR

Aditya Yadav

Drama Others Abstract

0  

Aditya Yadav

Drama Others Abstract

प्रेमाचे फुल

प्रेमाचे फुल

1 min
691


एकदा सगळ्या फुलांचे गुलाबाशी झाले वैर

सगळेच्या सगळे बिचाऱ्या गुलाबाशी भांडायला झाले स्वैर

विचारू लागली फुले, गुलाबा कोणती ऐसी जादू केली

कोणत्या ऐशा गुणाने प्रियकराने तुझी निवड केली?

आमचाही रंग चांगला दिसायलाही आहोत बरे

वास तर तुझ्याहून चांगला मग तुझाच मोह त्याला का पडे

गुलाब हसला जरासा अन रहस्य भेदू लागला

काय कारण की प्रियकर त्याच्याच मागे लागला

गुलाब फुलांना म्हणाला

दिसायला तर चांगले आहेतच लाखपटीने, वास छान हा

काट्यांचे महत्व जास्त कळले प्रेम करता प्रियकारा

सुखी क्षणांच्या सोबत असणे म्हणजे काही प्रेम नव्हे

दुःख सोसता घट्ट होणारे पक्के प्रेयसीला प्रेम हवे

फुलांस पटले, भांडण निजले। फुलगण एकमेकात कुजबुजला

सुखदुःखांची साठवण म्हणून गुलाब प्रेमाचे फुल बनला

गुलाब प्रेमाचे फुल बनला ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama