STORYMIRROR

Aditya Yadav

Romance Tragedy

3  

Aditya Yadav

Romance Tragedy

विनंत्याची विनंती झाली

विनंत्याची विनंती झाली

1 min
60

तिनी माझी कविता ऐकली

आणि आमचं जमलं


मग तिनी विनंती केली

मी कविता केली

तिनी विनंत्या केल्या

मी कविता केल्या


दिवस गेले ओळी भिजल्या

रात्री सोबत कदाचित

हृदयातील तिच्या

भावना निजल्या


मग तिच्या विनंत्याची

विनंती झाली

माझी कविता हळू हळू

बंद झाली


तिनी माझी कविता ऐकली नाही

आणि आमचं जमलं नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance