Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Aditya Yadav

Drama Others Abstract


2  

Aditya Yadav

Drama Others Abstract


प्रेमाचे फूल

प्रेमाचे फूल

1 min 1.8K 1 min 1.8K

एकदा सगळ्या फुलांचे गुलाबाशी झाले वैर

सगळेच्या सगळे बिचाऱ्या गुलाबाशी भांडायला झाले स्वैर

 

विचारू लागली फुले गुलाबा कोणती ऐसी जादू केली

कोणत्या ऐशा गुणाने प्रियकराने तुझी निवड केली

आमचा ही रंग चांगला, दिसायलाही आहोत बरे

वास तर तुझ्याहून चांगला मग तुझाच मोह त्याला का पडे

 

गुलाब हसला जरासा अन रहस्य खोलू लागला

काय कारण की प्रियकर त्याच्याच मागे लागला

गुलाब फुलांना म्हणाला,

दिसायला तर चांगले आहेतच लाखपटीने वास छान हा

काट्यांचे महत्व जास्त कळले प्रेम करता प्रियकारा

 

सुखी क्षणांच्या सोबत असणे म्हणजे काही प्रेम नव्हे

दुःख सोसता घट्ट होणारे पक्के प्रेयसीला प्रेम हवे

 

फुलांस पटले, भांडण निजले फुलगण एकमेकात कुजबुजले

सुखदुःखांची साठवण म्हणून गुलाब प्रेमाचे फूल बनला

गुलाब प्रेमाचे फूल बनला.


Rate this content
Log in

More marathi poem from Aditya Yadav

Similar marathi poem from Drama