मी नेहमीच तुझी पर्वा करतो
मी नेहमीच तुझी पर्वा करतो
1 min
394
मी नेहमीच तुझी पर्वा करतो
हो करतो.
कदाचित ती दिसत नसेल तुला नेहमी
पण हो मी नेहमीच तुझी पर्वा करतो
जेव्हा आपण कोणताही विचार न करता
वेड्यासारखे एकमेकांशी भांडत असतो
तेव्हाही संपूर्ण रागात असतानाही
नेहमी मी तुझी पर्वा करतो.
तुझ्यापासून लांब असताना कामात
हा मी तुला वेळ देऊ शकत नसतो
पण तेव्हाही कामानी गच्च भरलेल्या मेंदूमध्ये
नेहमी मी तुझी पर्वा करतो
शब्दातून दिसत नसेल कदाचित् आणि वागण्यातही
भेटल्यावर आणि फोनवर बोलतानाही
पण खरंच सांगतो
नेहमी मी तुझी पर्वा करतो
