काही नव्हतं तिथं
काही नव्हतं तिथं


माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून सौंदर्य दिसलं
सुकलेल्या फुलांशिवाय नाहीतर काही नव्हतं तिथ
प्रेम माझं होत ग म्हणून एवढं बहरलं
सुकलेल्या ढेकळांशिवाय काही नव्हतं तिथं
गुलाबी लाल पांढरा पिवळा रंग मी पहिला
गडद आधाराशिवाय नाहीतर काही नव्हतं तिथं
अलगद कैक हृदय घेऊन रोज मिरवशील तू
पाहिलं असतं माझ्या हृदयात तर
तू सोडून काही नव्हतं तिथं