ती आहे मी नाही.
ती आहे मी नाही.
1 min
736
रात्र त्रास देते हल्ली दिवसाचा मोह आवरत नाही
रात्री वाट बघतो सकाळ व्हायची आणि दिवस भर रात्रीची
शहाणा झालो होतो मे अचानक स्वतः ला ओळखल्यावर
आणि आता शोधतो की मी आहे कोण ??
मी होतो तेव्हा मी नव्हतो मी
आता आहे तर नाहीये तो मी.
कोडी कोण टाकताय काही कळत नाही
सोडवता सोडवता कोडेच आठवत नाही.
ती होती तेव्हा ती नव्हती मी होतो
आता ती नाही तर ती आहे मी नाही.
ते सुख नव्हते जे मी सुख समजत होतो
ते दुःख नव्हते जे मी लांब ढकलत होतो.
मी आहे हा आहे मी आजचा
उद्याचा मी असेन मी कदाचित जो आहे मी.
