प्रेम असंच असतं
प्रेम असंच असतं


कधी जवळ नसताना
ती कशी जवळ भासते
पौर्णिमेच्या चंद्राजवळ
तिचे चांदणे लुकलुकते
डोळ्यासमोर दिसली
कळी हस्याची फुलते
लाजणे मुरडणे बघून
मन हलके हलके होते
फोनवर बोलता बोलता
हळूच मिठीत.....शिरते
हृदयाच्या.....स्पंदनांना
आठवांची भुल.....देते
राग आला कधी तरी
बोलणार नाही म्हणते
सकाळी गुड मॉर्निंगचा
आधी तिच मेसेज करते
माझं प्रेम नाही बोलत
तिच रुसून फुगून बसते
एकदा सॉरी बोललो की
लाडात येऊन कुरवाळते
"जेवला का" विचारणारी
तिच नेहमी पहिली असते
जीवापाड प्रेम....असूनही
भांडणात पटाईत असते
कोरड्याठाक आसवांना
फुंकर तिची ओलावा देते
भेदक नजरेत.......तिच्या
तिचेच प्रतिबिंब.....दिसते