सह्याद्री
सह्याद्री


सांग ना रे कसा आहे
महाराष्ट्र माझा
वनवासी अवतरला जेथे
अयोध्येचा राजा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा
सोळावे शतक जयाचे
स्वराज्यसंस्थापक
कर्तव्यनिष्ठ विचारवंत
जनतेचा पालक
दाखव पिढ्यापिढ्यांना
इतिहास ताजा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा
संत सज्जनांची भूमी
साहित्याची नगरी
चंद्रभागेच्या वाळवंटी
वारकऱ्यांची वारी
अभंग भजन किर्तनाचा
नुसता गाजावाजा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा
लोककला भारूड गीते
ल
ोकसंगीत वारसा
कवी लेखक गीतकार अन्
मराठीचा आरसा
संस्कृतीची महती सांगतो
महाराष्ट्र माझा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा
निसर्गाचा दाहीदिशांना
बघावा अमूर्त ठेवा
पावसाळी वातावरणात
वाटे स्वर्ग हा नवा
मातीचा तो लळा लावतो
महाराष्ट्र माझा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा
दाहीदिशा चोहिकडे ऐसे
गडकिल्ले संवर्धन
मुंबई अन् कोकण म्हणजे
शांत समुद्र मंथन
पुन्हा भेटीची ओढ लावतो
महाराष्ट्र माझा
सांग सह्याद्री कसा आहे
महाराष्ट्र माझा