जिंकायचं हे जग
जिंकायचं हे जग


येऊ दे संकटे कितीही उद्याची
जागीच आपण थोपून टाकू
करीत सामना हुशारीने रे जरा
काळ्या मातीत गाडून टाकू
चांगल्या मनांची अन् क्षणांची त्या
लाभू दे की साथ आम्हाला
लागू दे जोर किती जीवास घोर
एकदा दाखवू दे रंग जगाला
आता हरायचं नाही रे केवळ
जिंकायचंय रे हे जग आम्हाला
मिळू दे मार्ग उज्ज्वल यशाचा
त्यातच मुसंडी मारून टाकू
होऊ दे सांगोपांग चर्चा आपली
ओरडून समद्या सांगून टाकू
कोणाच्या पोटात ओठात काय
समदं समजत की रे आम्हाला
तो शिखरावरील अपयशाच्या
दोर झेंड्याचा कापून टाकू
आडवे येणाऱ्या क्रूर गिधाडांचे
पंख मुळापासून छाटून टाकू
स्वराज्यासाठी उभा जन्म वेचला त्या
महाराजांचा आशीर्वाद आम्हाला