तुझ्याचसाठी
तुझ्याचसाठी


वाटते काळजी इतकी तुझ्या मनाची
रोजनिशी झटतो आहे तुझ्याचसाठी
दमलो नाही की थकलो नाही आजवर
सारं प्रेमाने जिंकतो आहे तुझ्याचसाठी
स्टेशन नसताना प्रवासाच्या आयुष्यात
वाटेत अर्ध्या थांबतो आहे तुझ्याचसाठी
तू हसावी तू बोलावी तू राहावी आनंदी
दुःख लपवून हसतो आहे तुझ्याचसाठी
कशी आहेस?विचारून तुला सदासर्वदा
मन मारून तर जगतो आहे तुझ्याचसाठी
सांगू कसं? प्रेम मिळवण्याकरिता आपलं
अजुनी जगाशी झुंजतो आहे तुझ्याचसाठी