आई: आधार मनाचा
आई: आधार मनाचा


क्षणोक्षणी एका वेळी
कितीस निभावते आई
धडपड करून भूक ही
पोटाची भागवते आई
मावशी, बहीण, विण
नात्यातील विणते आई
साश्रू नयनांनी संसारी
रात्रंदिनी राबते आई
अंगी शीण भरून साय
दुधावरील वाटते आई
दुःख उराशी बांधून ती
गोंजारत असते आई
झालं गेलं विसरून सारं
केविलवाणे रांधते आई
दोष लेकाचे पोटी घालून
पदर लावून झाकते आई
कधी डोक्याला थापटत
अंगाई गीत म्हणते आई
प्रेमाने कधी जवळ घेत
आधार मनास देते आई
स्वतः परि सर्वदा कधीही
इतरांचा विचार करते आई
विचार तिचे मनाशी कुंठत
खुशीने आयुष्य जगते आई
वाईट वागणे बोलणे मुलाचे
निमूटपणे आपलं सहते आई
वेळेला मायेचा ओलावा देत
गोंदण प्रेमाचे घालते आई