सण बैलपोळ्याचा
सण बैलपोळ्याचा


या श्रावणमासामध्ये
उगवलाय दिवस सोन्याचा
पिठोरी अमावस्येला,
सण आलाय बैलपोळ्याचा ||ध्रु||
बैलांना स्नान घालून
सजवलंय शाल पांघरून
घातल्या रुद्राक्षाच्या माळा
पायी घुंगरू बांधून
घातलाय गावकऱ्यांनी
घाट मिरवणुकीचा ||१||
बैलांचे स्वागत करण्या
गावा लाविले पताके
आगमनाप्रित्यार्थ
आम्ही वाजवले फटाके
झालाय गावात गजर
ढोल ताशांचा ||२||
बैलांच्या कार्यासाठी
केले लाड गोड कौतिक
चालीरीतीत पूजन करुनी
दिला नैवेद्य पौष्टिक
आजचा उत्सव ही
मोठा शेतकऱ्यांचा ||३||